नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सणांपैकी एक महत्वाचा सण मानला जातो. श्रावण महिन्यातील सणांची सुरवात नागपंचमी पासून होते. नागपूजा करर्ण्याची सुरवात हि श्री कृष्ण कालखंडापासून झाली, कालिया या नागाचा श्री कृष्णाने वध केला. आणि त्या दिवसापासून नागपूजा करण्यास प्रारंभ झाला. मुख्यातः नागपंचमी हा शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो, याचे कारण असे आहे कि नाग हे शेतामध्ये आपले वारूळ बनवतात आणि शेतातील किडे आणि किटाणूंना खातात, म्हणजे एक प्रकारे नाग हे शेतीचे रक्षणच करतात. नागपंचमी या सणाचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व वेगवेगळे आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीनुसार हा सण साजरा केला जातो. या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेऊया भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कश्या प्रकारे नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी या सणाचा आनंद तुम्ही तुमच्या परिवार, मित्र, आणि तुमच्या ग्राहकांसोबत साजरा करू शकता. AdBanao app च्या माध्यमातून तुम्ही नागपंचमीच्या पावन पर्वावर नागपंचमी साठी तुमच्या व्यवसायाच्या Social Media Posts, नागपंचमी Special Greeting Posts,Business Offer Ads, Special Product Ads, Product Launch Posts, आणि AdBanao च्या खास Logo Maker या Feature मधून आपल्या बिझनेस साठी Logo बनवू शकता. या सर्व Features बरोबरच AdBanao app मध्ये अजून खूप सारे Features आहेत, तत्पूर्वी नागपंचमी या ब्लॉग चा आनंद घेऊया.
महाराष्ट्रमध्ये साजरी होणारी नागपंचमी
मराठी वारसा मराठी संस्कृती असलेलं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शेतकरी खूप आत्मिक भक्तीने नागपंचमी हा साजरा करतात. नागदेवतेला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटले जाते. शेताचं किड्या आणि किटाणूंपासून रक्षण करण्याचं काम नाग करतात, म्हणून नागपंचमीच्या दिवशी शेतकरी नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी नवीन कपडे परिधान करून पाटावर नागदेवतेची हळद आणि चंदनाने चित्र काढून त्याला लाह्या, दूध, आघाडा आणि दुर्वा वाहून नागदेवतांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. या उपवासामागे खूप सुंदर आख्यायिका सांगितली जाते, सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती, सत्येश्वर हा तिचा भाऊ, सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या दिवशी झाला. भावाच्या दुःखात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसला. त्यादिवसापासून पासून प्रत्येक स्त्री भावासाठी उपवास करते. शेतकरी आपल्या शेतातील वारुळाची पूजा करून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून नागदेवाची पूजा करतात.
राजस्थान मध्ये अशी साजरी होते नागपंचमी
राजस्थान मध्ये नागपंचमी हा सण कृष्ण पंचमी च्या दिवशी साजरा केला जातो. नागदेवाची चांदीची किंवा तांब्याची प्रतिमा बनून त्या प्रतिमेची पूजा केली जाते आणि नागदेवाला प्रसन्न केलं जात. काही लोकांना प्रतिमा बनवता नाही आल्या तर ते लोक एका दोरीला गाठी मारतात आणि नागदेवतेची पूजा करतात. त्याचप्रमाणे जे लोक साप पाळतात त्या लोकांना या दिवशी नवीन कपडे, जेवण, आणि दक्षिणा रूपात काही पैसे दिले जातात.
उत्तर प्रदेश मध्ये साजरी होणारी नागपंचमी
भगवान शिव उपासनेच राज्य म्हणून उत्तर प्रदेशची ओळख आहे. श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेचा महिना असतो आणि याच महिन्यात नागपंचमी हा सण असतो, त्यामुळे नागपंचमी या सणाला उत्तर प्रदेश मध्ये एक वेगळंच महत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सगळे उत्तरवासी नागदेवतेची पूजा करतात. नागदेवतेला दूध, दही, आणि जल अर्पण करून पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी उत्तर प्रदेश मध्ये बाहुलीला काठीने मारण्याची प्रथा आहे. यामध्ये बहिणी नागपंचमी येण्याआधी जुन्या कापडाची एक बाहुली बनवतात यामागे एक कथा आहे. प्राचीन काळामध्ये महादेव नावाचा एक मुलगा नागदेवाचा खूप मोठा भक्त होता. तो रोज महादेवच्या मंदिरात जाऊन नागदेवतांची पूजा करायचा आणि हि पूजा करत असताना साक्षात नाग त्याच्या पायाला वेढे घालून बसायचे. एक दिवस त्याच्या बहिणीने हे पहिले आणि तिने घाबरून त्या नाग देवतेला काठीने मारले. याचा महादेव ला राग आला आणि त्याने आपल्या बहिणीला सांगितले कि तू नागदेवतेला मारले याचा तुला दंड मिळणार आहे. आणि त्या दिवशीपासून प्रतीकात्मक स्वरूपात बाहुलीला मारण्याची प्रथा सुरु झाली. अश्या प्रकारे उत्तर प्रदेश मध्ये भक्तिनिष्ठ स्वरूपात नागपंचमी साजरी केली जाते.
या विविधांगी आणि विविध प्रकारे साजऱ्या होणाऱ्या सणाच्या निम्मित तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय AdBanao च्या मदतीने विविध प्रकारे वाढवू शकता. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही AdBanao च्या मदतीने Festival Posts, Whats app Stickers, तुमच्या व्यवसायासाठी Banner, Video Status, आणि बरच काही बनवू शकता आणि आपला व्यवसाय फक्त एका क्लिक मध्ये वाढवू शकता. तर आता आपण आपल्या ब्लॉग मध्ये पुढे जाऊया आता आपण अजून काही राज्यांमध्ये नागपंचमी हा सण कश्या प्रकारे साजरा करतात आणि त्याचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्व पाहूया….
मध्यप्रदेश मध्ये नागपंचमीचा उत्सव साजरी करण्याची पद्धत
मध्य प्रदेश मध्ये असलेल्या उज्जैन या शहरात एक नागदेवतेच मंदिर आहे. हे मंदिर भक्तांसाठी वर्षभरातून नागपंचमीच्या दिवशी एकदाच उघडलं जात. या मंदिरामध्ये नागचंद्रेश्वर महादेवाचं अस्तित्व असून या मंदिराचं महत्व असा आहे कि या मंदिरामध्ये शंकर आणि पार्वती नागदेवतेवर बसलेले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील सर्व भक्तगण नागपंचमीच्या दिवशी या नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जातात आणि नागपंचमी हा सण मोठ्या उत्सवात साजरा करतात.
मन्नारशाला नाग मंदिर आणि केरळ मधील नागपंचामी
केरळ मध्ये नागदेव आणि त्यांची पत्नी नागयक्षी यांचा मंदिर आहे. हे मंदीर अल्लेपी जिल्ह्यात असून 16 एकरमध्ये स्थित आहे. या मंदिरामध्ये तीस हजार नागदेवतांच्या मूर्ती आहेत. नागपंचमीच्या दिवशी केरळ मधील सर्व भक्तगण या मंदिरामध्ये एकत्र येऊन उरली कामजाहाथाल नावाची पूजा करतात. महिला अपत्य प्राप्तीसाठी नागदेवतेकडे आशीर्वाद मागतात. अश्या प्रकारे केरळ मध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमीच्या पावनपर्वावर AdBanao App च्या वरील सुविधांचा आणि Features चा वापर करा आणि आपला बिझनेस वाढावा.